ठाणे । ठाण्यातील लोकमान्य नगर, पाडा क्रमांक चारमध्ये श्री अष्टविनायक मित्र मंंडळाने यावर्षीसुद्धा सलग तिसर्या वर्षी कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणारे हे ठाण्यातील पाहिले मंडळ आहे. ठाण्यातील लोकमान्य नगर, पाडा क्र चारमधील श्री अष्टविनायक मित्र मंडळ यावर्षी 41 वा गणेशोत्सव साजरा करत आहे. मंडळांने आजपर्यंत गणेशोत्सवामध्ये विविध देखावे साकारले आहेत. त्यात ब्रह्म, विष्णू महेश असो अथवा विक्रम वेताळ हे देखावे त्यावेळी खूप गाजले. यावर्षी अष्टविनायक मित्र मंंडळाने कॅन्सरवर जनजागृती करत आहे. त्याबाबतची चित्रफीत दाखवण्यात येत आहे.
मंडळाचा धाडसी निर्णय
तीन वर्षांपूर्वी श्री अष्टविनायक मित्र मंडळाने गणरायाची मूर्ती कागदापासून घडवण्याचे ठरवले. या धाडसी निर्णयाला मंडळातील सर्व सभासदांनी पाठिंबा दिला. त्यामुळे मागील काही वर्षांपासून अष्टविनायक मित्र मंडळ कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करत आहे.
विभागातून जमा केला कागद
गणेशमूर्तीसाठीचा कागद मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विभागातून जमा केला आहे. जेणेकरून मूर्तीसाठी प्रत्येक भक्तांचा हातभार लागावा ही त्यामागची संकल्पना आहे. उरलेला कागद रिसायकल करून त्यापासून पर्यावरणपूरक वस्तू बनवण्यात येणार आहेत. गतवर्षी मंडळांने 1 लक्ष तुळशी बियांचे वाटप केले. तसेच एक पेन एक वही हा उपक्रम राबवले. रक्तदान शिबीर, विविध शैक्षणिक स्पर्धा, तसेच आरोग्य शिबिरांचे दरवर्षी आयोजन केले जाते.