कागदी पिशव्यांचा वापर करणे ही काळाची गरज- वर्षा जगताप

0

प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील विद्यार्थीनींना दिले प्रशिक्षण

राष्ट्रवादीतर्फे पिशव्यांच्या वापराविषयी जनजागृती

आकुर्डीः कागदी पिशव्यांचा वापर करणे ही काळाची गरज आहे. त्याचा प्रचार व प्रसार हे प्रत्येक महाविद्यालयातून झाले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा वर्षा जगताप यांनी केले. आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील विद्यार्थीनींना कागदी पिशवी प्रशिक्षणानिमित्त त्या बोलत होत्या. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कागदी पिशव्यांच्या वापराविषयी जनजागृती करण्यात आली. जास्तीत जास्त नागरिकांनी, महिलांनी कागदी पिशव्यांचा वापर करावा. यासाठी राष्ट्रवादी युवती संघटनेच्या अध्यक्षा वर्षा जगताप यांच्या पुढाकाराने व पीडीसीसी बँकेच्या सहकार्याने हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, पीडीसीसी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, प्रवक्ते फजल शेख, प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, निलेश पांढारकर, सुलक्षणा शिलवंत, संजय लंके, अमोल भोईटे, लाला चिंचवडे, पल्लवी पांढरे, कविता खराडे, बाळासाहेब जगताप आदी उपस्थित होते.

कागदी पिशव्यांचा वापर गरजेचा
राज्य सरकारच्यावतीने प्लास्टिक बंदीचा निर्णय झाल्यानंतर कागदी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्व नागरिकांनी कागदी पिशव्यांचा वापर करणे गरजेचे आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केले. वर्षा जगताप यांनी उपस्थितीत सर्व विद्यार्थींना कागदी पिशव्या कशा तयार करावयाच्या त्याचे फायदे व त्याव्दारे मिळणार्‍या उत्पन्नाबाबत, सविस्तर माहिती, दिली. अतिशय कमी भांडवलात सर्व गृहीणी, मुली हा व्यवसायत भाग घेऊन मोठा उद्योग उभारू शकतात, व त्याव्दारे चांगले आर्थिक उत्पन्न देखील कमवू शकतात. अगदी न्यूज पेपर पासून देखील वीना भांडवल हा व्यवसाय सुरू करता येईल, असे प्रास्ताविेकात त्यांनी सांगितले. जर मोठ्याप्रमाणात व्यवसाय करायचे असेल तर पीडीसीसी बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करू असे अर्चना घारे यांनी सांगितले.

सोनाली घाडे यांनी दिले प्रशिक्षण
प्राचार्य चासकर महाविद्यालयाच्यावतीने रोख पंधरा हजाराची रक्कम सदरच्या उपक्रमास मदत म्हणून जाहीर केली. महाविद्यालयातील विद्यार्थीनींना सोनाली घाडे यांनी कागदी पिशव्याचे नमुने सादर करूण प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सविता कुलकर्णी व आभार सारीखा मोहोळ यांनी मानले. या प्रशिक्षणास 300 विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. तसेच दुपारी महिला बचत गटातील महिलांना देखील मार्गदर्शन करण्यात आले.