‘कागर’ चित्रपटासाठी रिंकूचा खास लूक

0

मुंबई : ‘सैराट’ या चित्रपटातून आरचीच्या नावाने आपली छाप सोडणारी रिकू राजगुरु आता तिचा दुसरा चित्रपट घेऊन येत आहे. ‘कागर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

१४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजेच प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे प्रेमाचा उत्सव साजरा करण्यासाठी १४ फेब्रुवारी या खास दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्याची माहिती दिग्दर्शक मकरंद माने यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. चित्रपटाच्या तारखेसोबतच रिंकूचा खास लूकही शेअर केला आहे. यात रिंकू पारंपारिक वेशभूषेत दिसत आहे.