पुणे । अखिल मंडई मंडळाच्या श्री शारदा गजाननाची पूजा करण्यापासून मंडळाच्या संस्थापक परिवारास वंचित ठेवण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक राजन काची यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
मंडळाचा संस्थापक सदस्य या नात्याने मी, किशोर काची परिवारासह तिथे पूजेसाठी गेलो असताना मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अण्णा थोरात आणि त्यांच्या सहकार्यांच्या सांगण्यावरून पोलीस अधिकार्यांनी आम्हा संस्थापक सदस्यांना पूजा करण्यापासून वंचित ठेवले. त्यामुळे आम्ही मंडपाबाहेर बसून श्री शारदा गजाननाची पूजा केली. यामुळे आमची 150 वर्षांची परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न झाला. यामागे राजकीय स्वार्थ असून या प्रकाराबाबत आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत, असे काची यांनी पत्रकात म्हटले आहे. पोलिसांनी अटक करण्याची धमकी दिली असाही आरोप काची यांनी केला आहे.