काजलकुमारी, आयेशा मोहम्मद उपांत्य फेरीत दाखल

0

मुंबई । अव्वल मानांकन मिळालेल्या काजलकुमारी आणि दुसर्‍या मानांकित आयेशा मोहम्मदने सहज विजय मिळवत जुहू विलेपार्ले जिमखाना आयोजित दुसर्‍या आंतर जोडजिल्हा कॅरम स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले.

काजलकुमारीने आगेकूच कायम राखताना ज्युनीअर गटातील माजी राज्य विजेती उर्मिला शेडगेवर 25-13, 25-4 असा विजय मिळवला. अन्य लढतीत आयेशाने सातव्या मानांकित ठाण्याच्या प्रगती बिर्जेला 14-25, 25-0,25-7 असे हरवले. उपांत्य फेरीत काजलकुमारीची लढत बिगर मानांकित जान्हवी मोरेशी होईल. जान्हवीने उपांत्य फेरीत स्थान मिळवताना तिसर्‍या मानांकित प्रीती खेडेकरचे आव्हान 25-12, 25-17 असे संपुष्टात आणले होते. आयेशाचा सामना सहाव्या मानांकित अंजली सिरीपुरमशी होईल. पुरुषांच्या लढतींमध्ये तिसर्‍या मानांकित संदीप देवरुखकर आणि चौथ्या मानाकित विकास धारीयाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले बिगर मानांकित हिदायत अंसारीने संदीपचा 25-13, 25-14 असा पराभव केला. विकास धारियाला संदीप दिवेने 25-9, 25-0 असे हरवल