काठापूर बुद्रुकमध्ये बिबट्याने मारली गाय

0

पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथे शेतकर्‍याच्या गोठ्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये बिबट्याने एका गायीचा फडशा पाडला.

बिबट्या पाळीव जनावरे, कुत्री प्रवासादरम्यान माणसांवरही हल्ले करत आहे. भिमाशंकर साखर कारखान्याजवळील काठापुर शेतकरी विशाल निवृत्ती करंडे यांच्या जनावरांच्या गोठ्यात 14 महिन्यांची गाय बांधलेली होती. गाय गोठ्यात दिसत नाही म्हणून करंडे यांनी गायीची शोधाशोध सुरू केली. यावेळी करंडे यांची गाय बाजुच्या शेतात मृतावस्थेत आढळून आली. या गायीवर बिबट्याने रात्रीच्या सुमारास हल्ला करुन शेजारील शेतात नेऊन फडशा पाडला होता.