कात्रजला पोषण आहारातून २३ मुलांना विषबाधा !

0

पुणे: कात्रज येथील रामभाऊ म्हाळगी शाळेतील ८ वीच्या २३ विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या सेवनाने विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या सर्व विद्यार्थ्याना उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांपैकी ४ मुले अत्यवस्थ असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

शाळेतील मुलांना नेहमी प्रमाणे पोषण आहाराचा भात देण्यात आला. त्यानंतर या मुलांना उलट्या सुरू झाल्या. तसेच त्यांना चक्करही येऊ लागली. त्यानंतर त्यांना तातडीने भारती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका संपदा किरकोले यांनी दिली.