मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती काही दिवसांपासून गंभीर आहे. त्यांचं ब्रेन काम करत नसल्याची माहिती समोर आली आहे. अशात सोशल मीडियावर कादर खान यांचे निधन झाल्याची बातमी व्हायरल होत आहे.
कॅनडातील रुग्णालयात कादर खान यांच्यावर उपचार सुरु असून ते सध्या व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती त्यांचा मुलगा सर्फराजने दिली आहे.