कादर खान यांच्या निधनाने स्मृती इराणी भावूक; म्हणाल्या माझे स्वप्न अपूर्ण राहिले

0

मुंबई- हिंदी चित्रपट सृष्टीतील विनोदी ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे आज निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. कॅनडा येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. स्मृती इराणी यांनी एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी माझे एक स्वप्न अपूर्ण राहिले आहे. मी कादर खान यांना कधी भेटले नाही, मात्र मी त्यांचे आभार मानणार आहे. त्यांनी प्रेक्षकांना भरभरून हसविले यासाठी मी त्यांचे आभार मानणार असल्याचे इराणी यांनी सांगितले.