कानडी रणधुमाळी : बेळगावात तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त

0

निवडणुकीत वाटपासाठी आणल्याचा संशय

बेळगाव । शहरातील सदाशिव नगरमधील पीडब्ल्यूडी वसाहतीतील एका घरातून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटांचा साठा जप्त करण्यात आला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या नोटा आढळून आल्याने जोरदार खळबळ माजली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात 12 मे रोजी निवडणुका होणार आहेत. तर 15 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर या नोटा वाटपासाठी आणल्याचा संशय पोलिसांना आला होता. पोलिसांना सुरूवातीला या खर्‍या नोटा असल्याचे वाटले होते. परंतु, नंतर या बनावट नोटा असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी अजित निडोनी (रा. मूळ विजयपूर, कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

मंजुनाथ बागलकोटी याच्या निवासस्थानी धाड टाकली. त्यावेळी मंगळवारी मध्यरात्रीच्या पोलिसांना त्यांच्या घरात 500 व 2000 रूपयांच्या नोटा आढळून आल्या. या नोटा निवडणुकीत वाटपासाठी आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अजित निडोनीला नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे मंगळवारपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे.