कानळद्यातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील 24 वर्षीय तरूणाने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेतला. दीपक संजय धनगर (24, रा.कानळदा, ता. जि.जळगाव) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
जळगाव तालुक्यातील कानळदा येथे दीपक धनगर हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास असून तो हातमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. मंगळवार, 26 जुलै रोजी रात्री नऊ वाजता दीपकने कुटुंबियांसोबत जेवण केले. त्यानंतर तो वरच्या मजल्यावरील रुममध्ये गेला. याठिकाणी दीपकने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करीत त्याला मृत घोषीत केले. या प्रकरणी मंगळवार, 26 जुलै रोजी रात्री उशिरा तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास साहेबराव पाटील, माणिक सपकाळे हे करीत आहे.