अंबरनाथ । कानसई विभागात राहणार्या उरुजू खान उर्फ ऐश्वर्या आशिष कुलकर्णी यांनी मिस्सेस आशिया पॅसिफिक किताब पटकावून अंबरनाथचे नाव आशिया खंडात उज्जवल केल्याबद्दल कानसई परिसरातीलचे माजी नगरसेवक कुणाल भोईर आणि विभागातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.उरुजू खान उर्फ ऐश्वर्या आशिष कुलकर्णी यांनी नुकतीच सिंगापूरमध्ये येथे झालेल्या मिसेस आशिया पॅसिफिक सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेमध्ये आशिया खंडातील 24 देशांच्या सौंदर्यवतींनी भाग घेतला होता.
त्या अंबरनाथच्या रहिवासी उरुजू खान यांनी किताब पटकावला आहे. मूळच्या घाटकोपरच्या असणार्या उरुजू खान यांनी गेल्या 3 ते 4 वर्षांपूर्वी येथील कानसई मध्ये राहणार्या आशिष कुलकर्णी यांच्याशी प्रेमविवाह केला होता. कामानिमित्ताने दोघेही परदेशी आखाती देशातील कतारमध्ये नोकरी करतात. सदरची सौंदर्य स्पर्धा उरुजू यांनी जिंकल्यामुळे अंबरनाथचे नाव आशिया खंडात उज्वल केले. उरुजू खान व आशिष कुलकर्णी यांच्या कुटुंबाचे कानसईकरांच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन करत त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी कानसई विभागाचे माजी नगरसेवक कुणाल भोईर, कानसई गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र वाणी, योगेश भोईर, तसेच विभागातील नागरिक उपस्थित होते.