पिंपरी : येथील कापड व्यापारी कुलवंत जनजीत जुनेजा (वय 37, रा. मोनिका अपार्टमेंट, पिंपरी) यांचा मृत्यू अकस्मात नसून खूनच झालेला आहे. त्यांचा गळा आवळला असल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.22) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांना संशय आल्याने हा प्रकार उघडकीस आला.
जुनेजा सकाळी अचानक त्यांच्या राहत्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले. सकाळी पाचच्या सुमारासच ते बेशुद्ध पडल्याचे समोर आले.त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेचा पोलिसांना संशय आला यावेळी पोलीसांनी शवविच्छेदन अहवाल मागवला असता. त्यामध्ये जुनेजा यांचा बेशुद्ध पडण्यामुळे मृत्यू झाला नव्हता तर गळा आवळल्याने श्वास गुदमरुन मृत्यू झाल्याचे सांगितले होते. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.