कापसाच्या 314 पाकीटांची विक्री करण्यास बंदी

0

शिंदखेडा। कृषी संचालक (निवगुनि) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी जारी केलेल्या 5 मे 2017 च्या आदेशान्वये कापसाचे रासी सीड्स लि. कंपनीचे रासी-659 बीजी-2 हे वाण कापूस बियाणे विक्री परवान्यातून निलंबीत करण्यात आलेले आहे.

त्या अनुषंगाने व शेतकर्‍यांना कीड रोगास बळी पडणार्‍या वाणाची विक्री होऊ नये याकरीता शिंदखेडा तालुक्यातील 11 बियाणे विक्रेत्यांकडे आढळून आलेल्या रासी- 659 बी.जी.2 कापसाच्या 314 पाकीटांना बियाणे निरीक्षक तथा कृषि अधिकारी डॉ.तुषार तिवारी यांनी विक्री बंद आदेश पारीत केले आहेत. कृषी संचालकांचे आदेश पारित होण्यापुर्वी ज्या 14 विक्रेत्यांनी या वाणाची विक्री केल्याचे आढळून आले आहे. अशा एकुण 712 पाकीटांच्या बियाणे साठ्याबाबत तपासणीसाठी शेतकर्‍यांच्या याद्या डॉ.तिवारी यांनी ताब्यात घेतल्या आहेत. शेतकरी बांधवांनी अशा गोष्टींना बळी पडू नये असे आवाहन केले आहे.