मुक्ताईनगर तालुक्यातील संतापजनक प्रकार ; अनेक गावांमध्ये पंचनाम्याला ‘खो’ ; तहसील प्रशासनाला काँग्रेस पदाधिकार्यांचे निवेदन
मुक्ताईनगर– तालुक्यात कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला असून पंचनाम्यांना अनेक ठिकाणी खो देण्यात आला असून नायगाव तलाठ्यांनी गाव पुढार्यांच्या घरात बसूनच पंचनामे केल्याचा मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. बियाणे व विमा कंपन्या व शासनाचे आकस्मिक आपत्ती निवारणमधून शेतकर्यांना अनुदान देण्याचे व शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले असतानाही तालुक्यात मात्र पंचनाम्यांना खो देण्यात आला आहे.
गाव पुढार्यांच्या घरी पंचनामे
तालुक्यातील नायगाव येथील तलाठी हे शेतात बांधावर न जाता गावातील पुढार्यांकडे बसून पंचनामे करत आहेत या संदर्भात काँग्रेसच्या ही तक्रार लक्षात आल्यानंतर शेतकर्यांसह काँगे्रसने गुरुवारी तहसीलदारांना निवेदन देत बोंड अळी ग्रस्त शेतकर्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार केली आहे.