कापूस चोरटे जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव : शेतकर्‍याकडील सुमारे 70 हजारांचा कापूस चोरीचा प्रकार नुकताच पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाणे हद्दीत घडला होता. या प्रकरणी गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव गुन्हे शाखेने पिंपळगाव हरेश्वर येथील दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नशिरोद्दीन युसूफ तडवी (29) व आशिक अजित तडवी (19, दोन्ही रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून 11 हजार 245 रुपये किंमतीचा कापूस, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व अ‍ॅपे जप्त करण्यात आली.

चोरीचा कापूस विकला व्यापार्‍यास
आरोपींनी चोरी केलेला वरखेडी येथील कापूस व्यापारी प्रवीण पांडुरंग पाटील यांना विकल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्यासह मुद्देमाल पिंपळगाव हरेश्वर पोलिसांना सोपवण्यात आला.

यांनी आवळल्या मुसक्या
जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लक्ष्मण अरुण पाटील, किशोर ममराज राठोड, रणजित अशोक जाधव, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, विनोद सुभाष पाटील, ईश्वर पंडीत पाटील, चालक मुरलीधर बारी, अशोक पाटील आदींनी आरोपींना अटक केली.