नवापूर । नवापूर तालुक्यातील शेतकर्यांना कापसाच्या पिकाच्या नुकसान भरपाई पोटी पिकविमा अनुदान त्वरित मिळावे. वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर जमा करावे अन्यथा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल अशा इशारा तहसीलदारांना शेतकर्यांच्या शिष्ठ्मंडळाने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना त्वरित अनुदान देण्याची मागणी
नवापूर तालुक्यातील शेतकर्यांना कापसाच्या नुकसान भरपाई पोटी पिकविमाचे नवापूर तहसील कार्यालयात डिसेंबर 16 मध्ये अनुदान प्राप्त झालेले आहे. परंतु आजतागायत अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान गेल्या तीन ते चार महिन्या पासून लाभार्थ्यांना मिळालेले नाही. तालुक्यातील शेतकर्यांच्या पिकविमा अनुदान सात दिवसाच्या आत त्यांच्या बँक खात्यावर टाकण्यात यावे. तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान पेंशन लाभार्थांच्या बँक खात्यात जमा करावे अन्यथा तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा नेण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर जिपचे माजी अध्यक्ष भरत गावित, पस उपसभापती दिलीप गावित, बाजार समितीचे उप सभापती भानुदास गावित, नवापूर तालुका काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष आर. सी. गावित, माजी पंस उपसभापती कुथ्याभाऊ गावित, शेतकरी संघाचे संचालक रोबेन नाईक बाजार सामीचे संचालक,नवलसिंग गावित,जालमसिंग गावित, सरपंच ईश्वर गावित,सुरेश गावित, ,सुनील गावित ,राजाराम गावित,प्रेमाजित कोकणी अनिल गावित वेच्या गावित दिलीप कोकणी जहामू गावित,इसू गावित,शंकर गावित,जयनु गावित वाड्या कोकणी,दिलीप.डी.गावित,वसा गावित,दासू गावित,प्रभू वळवी रविकांत गावित,कुंवरसिंग गावित,धरमसिंग गावित,परेश गावित, ,सुभाष गावित केसरया गावित अर्जुन गावित आलू गावित बाबू गावित ,दत्तू गावित ,दिलीप एस गावित गुलाब गावित, दामू गावित,तुकाराम गावित,रतिलाल कोकणी, दिगंबर वसावे,वसंत गावित, रोहिदास गावित, जेयस गावित यांच्या सह्या आहेत.