कापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा विनयभंग

Woman molested while picking cotton in Muktainagar taluka मुक्ताईनगर : कापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना शनिवार, 3 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रमेश देविदास कांडेलकर (चारठाणा, ता.मुक्ताईनगर) विरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिठी मारत केला विनयभंग
मोरझिरा शिवारातील एका शेतात पीडीत महिला कापूस वेचणी करीत असताना आरोपी रमेश कांडेलकर याने महिलेला मिठी मारत अश्लील वर्तन केले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक राहुल बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्रावण जवरे करीत आहेत.