नंदुरबार। रेल्वेतून कबुतरांची तस्करी करणाऱ्या सुरत एका टोळीला नंदुरबार रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची कारवाई केली,अटक करण्यात आलेले 5 लोक असून त्यांनी बनारस येथून सुमारे 500 कबुतर आणले होते, त्यांची किंमत सुमारे 2 लाखाच्या आसपास आहे,गुजरात राज्यातील सुरत येथे ते रेल्वेने घेऊन जात होते, याची भणक लागल्याने नंदुरबार येथे त्यांना पकडण्यात आले, रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलीस यांनी ही कारवाई केली आहे,त्या मुळे रेल्वेतील तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे,