कामगारांच्या ज्वलंत समस्यांबाबत रेल कामगार सेनेची महाप्रबंधकांशी चर्चा

भुसावळ : भुसावळ दौर्‍यावर आलेले रेल्वेचे महाप्रबंधक आलोक कंसल यांची कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेत त्यांच्याशी कर्मचार्‍यांच्या विविध ज्वलंत प्रश्‍नांवर चर्चा केली तसेच त्यांचा प्रसंगी सत्कारही करण्यात आला. महाप्रबंधक आलोक कंसल यांनी बहुसंख्य समस्या निकाली काढण्याचे आश्‍वासन दिले. भुसावळ विभागात कोरोना महामारीच्या काळात रेल्वे प्रशासनाने उत्कृष्ट कार्य केले व कोरोना पॉझीटीव्ह कामगारांना विशेष प्रकारे धीर देवून मनोबल वाढवले, असे रेल कामगार सेनेतर्फे महाप्रबंधकांना सांगण्यात आले. कोरोना काळात चांगले कार्य केल्याबद्दल रेल कामगार सेनेचे महाप्रबंधकांनी कौतुक केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी डीआरएम विवेककुमार गुप्ता, सिनीयर डीपीओ एन.डी.गांगुर्डे, स्टेशन मॅनेजर जी.आर.अय्यर, रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, राजेश लखोटे, प्रीतम टाक, विनोद वाघे, योगेश माळी, प्रदीप भुसारे, महेंद्र सोनवणे, अब्दुल अजीज, गोपाल पाटील, पंकज ठाकरे, कमलाकर बाणाईत, विजय तायडे, अरविंद थोरात, एम.के.शाहा, प्रकाश करसाळे, अनंत खेडकर, राकेश पाठकसह रेल कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.