कामगाराचा शॉक लागून मृत्यू

0

कल्याण : डोंबिवली पुर्वेकडील एम आय डी सी परिसरातील एस पी मेटल वर्क्स प्रा ली कंपनीत इलेक्ट्रिक चे काम करत असताना 26 जून रोजी आनंद साळगावकर या कामगाराचा शॉक लागल्याने मृत्यू झाला होता .

या घटनेनंतर आनंद यांची पत्नी अपूर्वा साळगावकर यांनी कंपनीचे मालक आणि मॅनेजर यांनी आपल्या पतीला इलेक्ट्रिक चे काम करते वेळी आवश्यक त्या सुविधा पुरवल्या नाहींत तसेंच निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती या तक्रारी नुसार पोलिसांनी एस पी मेटल वर्क्स प्रा ली कंपनीचे मालक आणि मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .