पिंपरी-चिंचवड : चर्होली येथील तापकीरनगर परिसरात सुरु असलेल्या बांधकाम साईटच्या पाचव्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू झाला होता. ही घटना 9 नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात ठेकेदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू मेहता असे ठेकेदाराचे नाव आहे. सरोज खांडेकर (वय 25 रा. च-होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्होली येथील तनिष्क ऑर्चिड कन्स्ट्रक्शन या बांधकाम साईटवर काम करत असताना फिर्यादी यांचे पती नरेंद्र आसाराम खांडेकर (वय 28) यांचा पाचव्या मजल्यावरुन पडले. नरेंद्र हे इमारतीच्या खालील उघड्या डक्टवर पडले. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. खांडेकर यांना तातडीने रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
कामाच्या ठिकाणी कामगारांना सुरक्षिततेसाठी येग्य ती साधन सामुग्री न पुरवल्याच्या आरोप करत मेहता या ठेकेदारावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस पुढील तपास करत आहेत.
Prev Post
Next Post