कामगारास दोन दिवसांची पोलिस कोठडी

0

जळगाव। ऑटोनगरातील अश्‍विनी लॉजिस्टिक’ या ट्रान्स्पोर्ट कंपनीत कार्यरत कामगाराने ट्रक भाड्याचे 2 लाख 73 हजार 600 रुपयांचे मालभाडे परस्पर आपल्या खात्यात वर्ग केल्याचा प्रकार समोर आला होता. औद्योगीक वसाहत कंपनीत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद होवुन संशयीत कामगाराला अटक करण्यात आली होती. आज त्याला जिल्हा न्यायालयात हजर केल्यावर त्याला दोन दिवसांच्या कोठडीत रवाना करण्यात आले आहे.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा…
महाराष्ट्रासह इतर राज्यात सुमारे चारशेहून अधिक ट्रक्स मालवाहतुकीसाठी पुरवठा करणार्‍या अश्‍विनी लॉजिस्टिक’ या ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या कामगाराने भालभाड्याची रक्कम परस्पर आपल्या खात्यात वळती करुन अपहार केला होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाल्यावर कंपनीचा कामगार साधुराम चतरसिंग खटकर(वय-35) याला अटक करण्यात आली. तपासाधिकारी सचिन बागुल यांनी आज संशयीताला न्यायालयात हजर केले. न्या. बी.डी.गोरे यांच्या न्यायालयाने संशयीतास 17 जुन पर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहे. सरकारपक्षातर्फे ऍड. तडवी यांनी कामकाज पाहिले.