कामगार नेते द्वारकानाथ पवार यांचे निधन

0

ठाणे : ठाणे शहरातील जेष्ठ कामगार नेते व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतलेले द्वारकानाथ पवार यांचे अल्पशा आजाराने आज (बुधवार) सकाळी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ७८ वर्षाचे होते.

द्वारकानाथ पवार यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तसेच ना.म. जोशी मार्ग सत्याग्रहात सक्रिय सहभाग घेतला होता. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ते क्रियाशील सभासद होते. १९८६ साली ठाणे महानगरपालिकेत काँग्रेसचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले. महानगरपालिकेत सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आदी महत्वाची पदे त्यांनी भूषविली. तसेच १९९८ साली शिवसेना प्रणित हिंद किसान कामगार सेनेच्या सरचिटणीसपदी त्यांची नेमणूक झाली. कामगार क्षेत्रात विविध पदावर त्यांनी काम केले होते. गेल्या काही वर्षांपासून पवार हे आजारी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, तीन नातवंडे असा परिवार आहे. आज दुपारी कोपरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.