कामगार युनियनचा मार्केट यार्डात मोर्चा

0

पुणे । मार्केटयार्डातील फळ विभागात टोळी क्रमांक 11 मध्ये काम करत असताना एका आडतदाराने कामगारास लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेच्या निषेधार्थ श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियनने मोर्चा काढून तिव्र निषेध व्यक्त केला. दरम्यान, कामगारास रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे युनियनने काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. कामगारास झालेल्या मारहाणीमुळे बाजार आवारात कामगांरामध्ये या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात असून यापुढील काळात जर कामगारांवर कोणी अन्याय केला तर सहन केला जाणार नसल्याचा, इशारा युनियनेचे अध्यक्ष अनंत कुडले यांनी दिला. सचिव संतोष नांगरे, खजिनदार विलास थोपटे, कार्याध्यक्ष सुर्यकांत चिंचवले आदी मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

कामगारांना हवी सन्मानाची वागणूक
बाजारातील आडत्याने एका कामगाराला केलेली मारहाण हे अमानवी कृत्य आहे. कामगारांना सन्मानाची वागणूक दिली जावी़ आगामी काळात कामगारांवर जर अशा प्रकारची मारहाणीच्या घटना घटल्या तर अशा प्रकारचे कृत्य खपवून घेतले जाणार नाही.
– अनंत कुडले, अध्यक्ष, कामगार युनियन