विविध प्रलंबित मागण्यांसाठी केले आंदोलन सप्ताह
संघटनेच्या 14 शाखांनी घेतला आंदोलनात सहभाग
खडकी : विविध प्रलंबित मागण्या तसेच केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ एम.ई.एस.कामगार संघटनेच्यावतीने दि.3 ते 8 सप्टेंबर दरम्यान विरोधी सप्ताह आंदोलन पुकारण्यात आले आहे. संघटनेच्या खडकीतील आणि पुणे शहरातील एकुण 14 शाखांच्यावतीने आंदोलन सप्ताहास प्रारंभ करण्यात आले आहे. संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष एच.आर.कातोरे, उपाध्यक्ष डी.एस.आदमाने, सचिव अजय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली जी.ई.सेंट्रल शाखेच्यावतीने ही सोमवार पासुन आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. शनिवारी 8 रोजी या सप्ताह आंदोलनाची समाप्ती करण्यात येणार आहे. शाखेचे अध्यक्ष दीपक नानकशाई, सचिव राजु अंगिर, एम.एस.यळवंते, संजय डोळस, सुनिल मिरजकर, तसेच वर्कर्स कमिटीचे सचिव बसुराज नाईक आदी कामगारांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.
हे देखील वाचा
संघटनेचे सचिव शेलार यांनी सांगितले की, 1988 च्या कामगार कायद्यात जाचकरित्या बदल करुन शासनाने कामगारांना देशोधडीस लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार नविन कामगारास हक्काची तसेच भविष्यकाळातील सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वाचा अधिकार असलेली पेंशन योजना बंद करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रातिल कारखाने व ईतर विभागात खासगीकरण करुन कामगार वर्गास वेठीस धरले गेले आहे. केंद्रशासनाच्या अशा इतर अनेक कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ संघटनेने शासनाचे लक्ष्य वेधण्याकरिता हे विरोधी सप्ताह आंदोलन पुकारण्यात आले आहे. या व्यतिरिक्त मागिल अनेकवर्षांपासुन प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात ही हे आंदोलन करण्यात आले आहे. एम.ई.एस.खात्यातील सर्व कामगारांना पाच हजार रुपये, गणवेश भत्ता तातडीने देण्यात यावा.
कामगारांच्या विविध मागण्या
नविन पेन्शन योजना तातडीने बंद करुन नविन भरती केलेल्या कामगारांनाही जुन्या पेंशन योजनेचा लाभ मिळावा. अनुकंपा तत्वावरील नोकर भरती प्रक्रीया तातडीने अंमलात आणावी. चौकीदार सफाई कामगारांना औद्योगिक कामगारांप्रमाणे मेटची बढती प्रक्रीया राबवावी. खात्यामध्ये चार्जमनचे पद निर्माण करुन सर्व स्कील्ड कामगारांना 4 हजार 600 रुपये ग्रेड पेचा लाभ मिळावा. खात्यातील सर्व लिफ्ट आँपरेटर यांना एफ.जी.एम.या पदावर समाविष्ट करण्यात यावे. सरळ भर्तीसाठी जाहिर झालेल्या सर्व 17 हजार जागा त्वरित भरण्यात याव्यात. रोजच्या कामा करिता करण्यात येणारे ठेके बंद करण्यात यावे. मेट पदाच्या भरती करिता शैक्षणिक अर्हता 10 वी ठेवण्यात यावी. एम.टी.डी.वाहन चालकांना चार स्तरिय पदोन्नती देण्यात यावी. अशा विविध मागण्या करीता हे विरोधी सप्ताह आंदोलन करण्यात येत आहे.