कामगार विरोधी धोरणाविरोधात भुसावळात सीआरएमएसचा मोर्चा

0

भुसावळ- सेंट्रल रेल्वे मजूदूर संघातर्फे कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात सर्व केंद्रीय ट्रेड यूनियन, फेडरेशन व असोसिएशनद्वारा 8 व 9 रोजी देशव्यापी संपाला नैतिक समर्थन देण्यासाठी रेल्वे स्टेशन ते डीआरएम कार्यालयापर्यंत विशाल मोर्चा काढण्यात आला.या मोर्च्यात शेकडो कामगारांनी सहभाग घेत सरकार व रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. मोर्चा डीआरएम कार्यालयात आल्यानंर द्वारसभा घेण्यात आली. या द्वारसभेला मंडल अध्यक्ष व्ही.के.समाधीया, झोनल सचिव पी.एन.नारखेडे, मंडल सचिव एस.बी.पाटील, एस.के.दुबे, एस.एस.चौधरी, ए.के.तिवारी, मेघराज तल्लारे, आर.एम.चिखलकर, हरीचंद सरोदे, डी.के.सोनी यांनी मार्गदर्शन केले. मोर्चा यशस्वितेसाठी अभय अखाडे, किशोर कोलते, गणेश सिंग, ए.एस.राजपूत, दीपक शर्मा, सुंदरम झा, चुन्नीलाल गुप्ता, उमाकांत बाविस्कर, भूषण सोनार, स्वप्निल पाटिल आदींनी परीश्रम घेतल्याचे मिडिया सेल सचिव मेघराज तल्लारे कळवतात.