कामचुकार अधिकाऱ्यांची खा. डाॅ.हीना गावित यांनी केली कान उघडणी

0

नवापूर। नंदुरबार लोकसभा मतदार संघाचे खासदार डाॅ.हीना गावित यांची नवापूर तालुक्यातील कोरोना विषाणू संदर्भात तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्याची आढावा बैठक सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात घेतली. यात कोरोना संदर्भात तालुक्यातील परिस्थिती जणू घेत तक्रारीचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. चांगले काम करणारे अधिकाऱ्यांचे कौतुक केले तर कामचुकार अधिकाऱ्यांची कान उघडणी केली.
बैठकीला पुरवठा अधिकारी महेश शेलार, तहसीलदार सुनिता ज-हाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, नगर पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी राजेंद्र नयन, विसरवाडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, तालुका वैद्यकीय अधिकारी हरिषचंद्र कोकणी, पालिका कार्यालयीन अधीक्षक अनिल सोनार, आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण, भाजपा सरचिटणीस एजाज शेख, राजू गावित, शहराध्यक्ष प्रणव सोनार आदी उपस्थित होते.
नवापूर तालुक्यातील रेशन वाटप, आरोग्य विषयक समस्या, शहरातील भाजीपाला मार्केट, किराणा दुकानवरील गर्दी, पंतप्रधान जनधन योजना अंतर्गत शासनाने नागरिकांच्या खात्यात ५०० रुपयांचा पहिला हप्ता जमा होता बॅकेत व बॅंक सुविधा केंद्रावर गर्दी करून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडल्याची तक्रार करण्यात आली. नवापूर तालुक्यात अडीच हजार नागरिकांना होम क्वारंटाईन केले आहे. १२ लोकांना क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले आहे. ३४ मजुरांना नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील इमारतीत ठेवण्यात आले आहे. सुदैवाने नवापूर तालुक्यात अद्याप एकही कोरोना बाधित रूग्ण नाही. असे असले तरी नवापूर तालुक्यातील सीमेवर कडक बंदोबस्तची आवश्यकता आहे. परराज्यातून येणारे काही लोक छुप्या मार्गाने प्रवेश करीत आहे. त्यांचा शोध घेऊन होम क्वारंटाईन करणे प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते आहे.
प्रत्येक राज्यात असलेले इतर राज्यातून आलेले मजूराना परत न पाठवता त्याचठिकाणी प्राथमिक सुविधा पुरविणे आवश्यक आहे. अशा परिस्थिती गुजरात राज्यात वाढता प्रभाव पाहता गुजरात प्रशासन बहुतेक मजुरांना त्यांचा राज्यात पाठवण्याचे निर्देशनात येत आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्याची डोकेदुखी वाढली आहे.
नवापूर शहरातील भाजीपाला विक्रेते यांना ओळखपत्र देऊन मास्क आवश्यक आहे. त्याची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात यावी. नवापूर शहर महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात असल्याने कोणी जिल्ह्यात घुसखोरी करणार नाही याबाबत पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी अश्या सुचना डाॅ.हीना गावित यांनी दिला.