चिंचवड (प्रतिनिधी) – पर्यावरण संवर्धन समिती (इसिए) यांच्यातर्फे कामयानी स्कूल फॉर मेंटली हँडीकॅप विद्या मंदिरमध्ये तीन पर्यावरण समित्यांची स्थापना गुरुवारी करण्यात आली. सदर शाळेत शिकणारे विद्यार्थी आणि त्यांची मानसिक अवस्था अभ्यासता त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न इसिए टीमने केला. शाळेतील सर्व विद्यार्थी ह्या उपक्रमात सहभगी झाले होतेे.
कचर्याबाबत केले प्रबोधन
यावेळी इसिए संस्थापक अध्यक्ष विकास पाटील यांनी घन कचरा व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली. आपली गरज, प्रत्येकाची गरज व आपली प्रत्येकाची त्यातील जवाबदारी सविस्तरपणे मुलांच्या समोर सोप्या भाषेत मांडली. ओला कचरा, सुका कचरा व घरगुती घातक कचरा या बाबत जनजागरण/प्रबोधन करण्यात आले. शाळेतीलनव्याने 100 पर्यावरण दूतांची नियुक्ती करण्यात आली. आत्ता पर्यंत पिंपरी चिंचवड शहरात इसिएने एकूण 12,000 पर्यावरण दूत तयार केले आहेत. इसिएतर्फे पर्यावरण समितीसाठी पर्यावरण पूरक भेट वस्तू संच मोफत यांना सुपूर्द केला.
पिंपरी चिंचवड महापालिका शहर अभियंता प्रवीण तुपे, दै. जनशक्तीचे व्यवस्थापकीय संचालक किरण चौधरी, संचालक विश्वास जपे, प्रभाकर मेरुकर, शिकंदर घोडके, अनिल दिवाकर, इंद्रजीत चव्हाण, अनघा दिवाकर, मिनाक्षी मेरुकर, रंजना कुदळे, गोविंद चितोडकर, शाळा मुख्याध्यापिका हेमा डेरे व शाळेचे शिक्षक व कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन समाज सेवक भाऊसाहेब कांबळे व आभर शाळा प्रमुख हेमा डेरे यांनी मानले .