कामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील

0

जळगाव – मध्य रेल्वेच्या भुसावळ, जळगाव स्थानकावरील अधिकारी अलर्ट आहेत की नाही, रेल्वेचा जर काही अपघात झाला तरी किती वेळात यंत्रणा पोहचले. या गोष्टींसाठी रेल्वे विभागाचे सोमवारी मॉक ड्रील पार पडले. प्रवासात नागरिक असलेले कामयानी एक्स्प्रेसचे डबे घरसल्याची माहिती देण्यात येवून संबंधित यंत्रणांचे परीक्षण करण्यात आले. दरम्यान अचानकच्या या प्रकारामुळे गाडीचे डबे घसरल्याची एक अफवा पसरली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने हे अपघात नसून मॉक ड्रिल असल्याबाबत दुजोरा दिला आहे. या मॉक ड्रीलमुळे तब्बल एक तास कामयानी एक्स्प्रेस कुर्‍हादडा, कुरकुड नाला, दहा पूलाव परिसरात तब्बल एक तास थांबून होता. प्रवाशांमध्येमधेही अचानकच्या या प्रकाराने खळबळ उडाली होती.

जळगाव तालुक्यातील कुर्‍हादडा शिवार कुरकुंड नाला, दहा पूलाव परिसरात अचानकपणे सोमवारी दुपारी 3.45 वाजेच्या सुमारास खांबा क्रमांक 403/26 याठिकाणी कामाईन एक्स्प्रेस थांबले. सुरुवातीला अनेकांना सिग्नल नसल्याने गाडी थांबली असेल वाटले. तसेच प्रत्यक्षदर्शीनाही तसाच अनुभव आला. मात्र काही वेळाने रेल्वेचे डबे घसरल्याची माहिती वार्‍यासारख्या पसरली. काळी वेळात म्हसावद, माहेजी, पाचोरा, जळगाव, भुसावळ येथील रेल्वे विभागाची यंत्रणा अधिकारी, कर्मचार्‍यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाली. यंत्रणा दाखल झाल्यानंतर कुठलेही डबे घसरले नव्हते तर हे मॉक ड्रील असल्याचे सांगण्यात आले. भविष्यात काही अपघात झाला तरी रेल्वे यंत्रणा किती वेळात घटनास्थळी पोहचते. या लाईनवरील यंत्रणा अलर्ट आहे, का याबाबत हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी कुर्‍हाळदा येथील पोलीस पाटील सुरेश न्हाहळदे याच्याकडून माहिती जाणून घेतली असता, कुठल्याही प्रकारचे डबे घसरले नव्हते तर रेल्वे विभागाचे मॉकड्रील असल्याची माहिती त्यांनी बोलतांना सांगितले. यंत्रणा अलर्ट आहेत का हे पाहण्यासाठी तब्बल तासभर गाडी याठिकाणी थांबून होती असेही पोलीस पाटील न्हाहळदे यांनी सांगितले.