दिव्यांगत्वावर मात करून घेतला आनंद
कामशेत : नुकत्याच पार पडलेल्या जागतिक दिव्यांगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामुळे दिव्यांगदिनानिमित्त कामशेत येथे तीन अंधांसह पाच जणांनी पराग्लायडिंग करीत हवेत झेप घेतली. आपण अपंग आहोत, त्याचा बाऊ न करता हे पॅराग्लायडिंगचा आनंद सर्वांनी घेतला. कोल्हापूर येथील प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड व निर्वाणा ऍडव्हेंचेर पुणे यांच्यावतीने या साहसी उपक्रमाचे आयोजन केले होते. प्रेरणाचे प्रमुख प्रा. सतीश नवले हे मूळचे पुण्याचे आहेत. अंध असून देखील त्यांनी एम.ए. एम.एड.पर्यंतचे शिक्षण पुणे विद्यापीठात पूर्ण केले आहे.
हे देखील वाचा
सुमारे 1000 फूट उंचीवर उडले
सध्या कोल्हापूर येथे ते प्रेरणा संस्थेच्या माध्यमातून अंधांसाठी काम करत आहेत. त्यांनी 10 वर्षांपूर्वी हवेत झेपावण्याची संकल्पना मांडली होती. त्यांची ही इच्छा निर्वाणा ऍडव्हेंचेर पुणे यांच्या माध्यमातून 3 डिसेंबर 2018 जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून पूर्ण झाली. सध्या कोल्हापूर येथे असणारे प्रा. सतीश नवले पुण्याचे मिलिंद कांबळे आणि पूनम खुळे या तीन अंधांनी पॅराग्लायडिंग’च्या साहाय्याने सुमारे 1000 फूट उंचीवर पाच तास उडण्याचा आनंद घेत जागतिक अपंग दिन साजरा केला. त्यांच्या सोबत सुनील रांजणे आणि शिवाजी करडे या डोळस’ व्यक्ती होत्या. या साहसी उपक्रमासाठी निर्वाणचे रवी शेलार, विनोद आणि बाळू या पायलटणी सहाय्य केले. वातावरणातील बदल कसे झेलायचे याचे पूर्व प्रशिक्षण नसतानाही या दिव्यांगानी 100 हुन अधिक प्रत्यक्षदर्शीच्या उपस्थित हा थरार अनुभवला.