तळेगाव । कामशेत येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या वेट अॅण्ड जॉय वाटर पार्कमध्ये पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रविवार (दि. 17) दुपारी दोनच्या सुमारास घडलेल्या या घटनेत इंद्रजीत चंद्रशेखर तोरणकर ( वय 31 रा. राजगुरूनगर, खेड) यांचा मृत्यू झाला, अशी माहिती कामशेत पोलिसांनी दिली. जुन्या पुणे-मुंबई महामार्गाजवळ मुंढावरे गावाच्या हद्दीतील वेट अॅण्ड जॉय वाटर पार्क येथे चाकण येथील महिंद्रा सीआयई कंपनीतील एकूण 11 कर्मचारी पर्यटनासाठी आले होते. यावेळी इंद्रजीत तोरणकर यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे करीत आहेत.