कामांची यादी अंतिम नसल्याचा भोळेंनी दिला खुलासा

0

जळगाव । महापालिकेला मुख्यमंत्री यांच्याकडून मिळालेला 25 कोटी रुपयांच्या निधीतील कामांची यादी अद्याप अतिंम झाली नसल्याचा खुलासा आ. सुरेश भोळे यांनी सोमवारी केला. महापालिकेत डॉक्टरांच्या बैठकीसाठी महापौरांच्या दालनात आ. भोळे आला असता मेहरुणमधील नगरसेवकांनी वार्डातील कामे घेतले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याने त्यांनी हा खुलासा व्यक्त केला.

दोन वर्षांपूर्वी 25 कोटींच्या निधीची घोषणा
जळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री यांनी 25 कोटीचा निधी मंजूर केला आहे. या निधींच्या कामावरुन सत्ताधारी व विरोधक भाजपामध्ये कामांवरुन व श्रेयावरुन नाट्य रंगलेले आहे. जळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी 25 कोटींच्या निधीची घोषणा केली होती. त्यानुसार निधी वितरीत करण्याबाबतचा अध्यादेश सरकारच्या नगरविकास विभागामार्फत जारी करण्यात आले आहेत. जळगाव शहरातील विकास कामे निश्चित करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.या समितीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आ. सुरेश भोळे आणि सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांचा समावेश आहे. निधीतील कामे महापालिकेकडून न होता, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार आहेत. विशेष म्हणजे या अगोदर करण्यात आलेली सत्ताधारी यांची कामांची यादी डावलून नविन कामांची यानी आ. भोळे यांनी बांधकाम विभागाला दिली आहे.

कोणतीही कामे रद्द नाहीत
महापौरांच्या दालनात आ. सुरेश भोळे आले असता. माजी उपमहापौर व मेहरुणचे नगरसेवक सुनिल महाजन यांनी आ. भोळे यांना मेहरुण परिसरातील 4 कोटी रुपयांची कामे यादीतून काढल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी महापौर नितिन लढ्ढा, नगरसेवक शामकांत सोनवणे, नितिन बरडे देखिल उपस्थित होते. यावर 25 कोटीच्या कामांच्या यादीतील कोणतेही कामे रद्द केलले नाहीत. काही कामे प्रलंबित ठेवली आहेत. मुख्यमंत्री यांच्याकडून महापालिकेसाठी आणखी 50 कोटी रुपये मिळणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरिष महाजन यांनी सागीतल्याची माहीतीही आ. भोळे यांनी दिली.