कामातील सातत्य सिंधी बांधवांकडून शिकावे : गोरखे

0

सिंधू सेवा संगमचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

चिंचवड : सिंधी बांधवांची संस्कृती अतिशय प्रेरणादायी आहे. सिंधी समाजाची एकता संपूर्ण देशात आदर्श मानली जाते. सिंधी बांधवांची कामाची चिकाटी वाखणण्याजोगी आहे. व्यावसायिक प्रगती आणि यशस्वी होण्यासाठी चिकाटी, कष्ट व कामातील सातत्याची आवश्यकता असते. यशस्वी सिंधी बांधवांकडून या त्रिसूत्रीचे अनुकरण करावे. मी सिंधी बांधवांशी खूप पूर्वीपासून जोडला गेलो आहे. सिंधी बांधवांची संस्कृती अतिशय प्रेरणादायी आहे. सिंधी समाजाची एकता संपूर्ण देशात आदर्श मानली जाते, असे मत नॉव्हेल इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष व भाजपचे प्रदेश सदस्य अमित गोरखे यांनी व्यक्त केले.

पिंपरीतील सिंधू सेवा संगमचा सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नॉव्हेल इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे उपस्थित बोलत होते. सिंधू सेवा संगम यांच्यावतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सिंधी नाटक ‘मन मौजी दिवाने’ हे नाटक सादर करण्यात आले. हा सांस्कृतिक कार्यक्रम डॉ. राजीव कृष्णनानी, सिंधू सेवा संगमचे प्रधान कमल मलकानी, सचिव सिरीचंद संगदिल आदींच्यावतीने आयोजित करण्यात आला. राम-शाम प्रो. स्टोअर्सच्यावतीने सर्वांना भोजन देण्यात आले.