कामात काटे असले तरी खचुन जाऊ नका : सिंधुताई

0

आकुर्डी : स्त्री खूप अल्पसंतोषी असते. संसारात दिवसभर कष्ट उपसूनही तिच्या वाट्याला सुखाचे चार शब्द येत नाहीत. चांगल्या कामात असंख्य काटे असतात; पण कधी खचून जायचे नसते, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केले. श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट व आकुर्डी ग्रामस्थप्रणीत आणि पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती आयोजित तीन दिवसीय सुबोध व्याख्यानमालेत ‘आईच्या काळजातून’ या विषयावरील प्रथम पुष्प त्या बोलत होत्या. यावेळी उद्योजक नित्यानंद पानसे, नगरसेविका वैशाली काळभोर, पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, दिलीप सुगवेकर आणि मुख्य संयोजक शंकर काळभोर उपस्थित होते. सुभाष पागळे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.