भुसावळ- वाराणसी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक आठवर वॉशेबल अॅप्रनचे काम सुरू असल्याने गेल्या काही दिवसांपासून कामायनी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती तर पुन्हा आठ 8 जुलैपर्यंत ही गाडी रद्द करण्यात आली आहे. डाऊन 11072 वाराणसी-एलटीटी कामायनी एक्स्प्रेस 28 ते 4 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली आहे तर अप 11071 एलटीटी-वाराणसी एक्स्प्रेस 26 जुलैपासून 2 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली. दरम्यान, 16230 वाराणसी-म्हैसूर एक्स्प्रेसही 28 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान तसेच 16229 म्हैसूर-वाराणसी एक्स्प्रेस 26 जुलै ते 31 जुलै दरम्यान रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घेवून गैरसोय टाळावी, असे आवाहन भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी केले आहे.