धुळे। कामावरुन काढल्याच्या रागातून साक्री रोडवरील कुमारनगर भागात राहणार्या व्यापार्याला मुंबई-आग्रा महामार्गावर रात्री चौघांनी मारहाण करुन लुटल्याची घटना घडली आहे. लुटारुंनी या व्यापार्याकडील 1 लाख 30 हजाराची रोकडही हिसकावून नेली. मात्र, फिर्याद दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच मोहाडी पोलिसांनी चौघा लुटारुंना बेड्या ठोकल्या आहेत. कुमारनगरातील सिंधी कॅम्प भागात राहणार्या दिपक मनोहरलाल मंदान (वय 43) या व्यापार्याने मोहाडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार मंदान यांचे अवधान एमआयडीसीमध्ये सिमेंट, स्टील विक्रीचा व्यवसाय आहे. रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन मंदान हे 1लाख 30 हजाराची रोकड घेवून मोटरसायकलने घरी जात असतांना एमआयडीसीजवळ त्यांना चौघांनी लुटले. रस्त्याच्या बाजूला असलेल्या काटेरी झुडपांमधून एक लुटारु अचानक मोटरसायकल समोर आला. त्यामुळे मंदान यांनी दुचाकी थांबविली त्याचवेळी रस्त्याच्या दुसर्या बाजूला उभे कुमारनगरातील व्यापार्याला मारहाण करुन चौघांनी लुटले. व्यापारी दिपक मंदान असलेल्या दोघांनी लाठ्या – काठ्यांनी मंदान यांच्यावर हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या दुचाकीच्या हॅन्डलला लावलेली पैश्यांची पिशवी हिसकावली. बाबा नाव लिहिलेल्या बुलेटवरुन एक माणूस घटनास्थळी आला. त्याच्या दुचाकीवर बसून ते फरार झाले.
लुटारूंना ठोकल्या बेड्या
मोहाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविली. आज सकाळी 10.20 वाजता लुटारुंना बेड्या ठोकल्या. चितोड गावात जाऊन नरेंद्र भगवान मोरे (वय 28), देविदास भगवान दावलकर (वय 23), गोकूळ श्रावण अहिरे (वय 22), विशाल रोहिदास नेवले (वय 20) या संशयितांना अटक केली आहे. डीवायएसपी हिंमतराव जाधव, एलसीबीचे पीआय परदेशी, एपीआय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वप्नील राजपूत, एएसआय अशोक रामराजे, हेकॉ देवा परदेशी, जितेंद्र वाघ, गणेश भामरे, अरीफ पठाण, सचिन गोमसाळे, गौतम सपकाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.