‘कामावर जा नाही तर वसाहतीतील खोल्या रिकाम्या करा’; बेस्ट कर्मचाऱ्यांना नोटीस

0

मुंबई – बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. बेस्ट प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कामगारांना संपातून माघार घेण्यास भाग पाडण्यासाठी बेस्ट प्रशासनाने त्यांना बेस्ट वसाहतीतील घर खाली करण्याची नोटीस पाठवण्यास सुरूवात केली आहे.

‘कामावर जा नाही तर वसाहतीतील खोल्या रिकाम्या करा’,असा आदेश बेस्ट प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अनधिकृत असल्याचा निर्णय औद्योगिक न्यायालयाने दिला. तसेच संप करू नये, असे आवाहनही बेस्ट उपक्रमाने केले होते. त्यानंतरही संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई सुरू असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.