माजी मंत्री एकनाथराव खडसेंचा ईशारा : रावेर तालुक्यात बैठकींचा सपाटा
रावेर- आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने बूथ रचनेला अधिक मजबूत करण्यासाठी बैठकांना सुरुवात केली असून सोमवारी निंभोरा-तांदलवाडी व मस्कावद – थोरगव्हाण गटातील शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, बूथ समिती सदस्यांची तांदलवाडी आणि मस्कावद येथे बैठक झाली. त्यात मार्गदर्शन करताना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी काम न करणार्या निष्क्रिय बुथप्रमुखांना घरी बसवण्याचा इशारा दिला. केंद्र व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. गावा-गावातील सर्व समाज, जातीच्या घटकांचा समावेश करून बूथ समिती करणे, बुथ प्रमुखांनी गावातील सर्व प्रमुख पुढार्यांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. गावातील बुथ प्रमुख हा पुढारी आणि शासनामधील दुवा असेल, असेही ते म्हणाले. तांदलवाडी येथे निंभोरा-तांदलवाडी गटाची, तर मस्कावद येथे मस्कावद-थोरगव्हाण गटातील बूथ प्रमुख आणि बुथ समिती सदस्यांची बैठक झाली. माजी खासदार डॉ.गुणवंतराव सरोदे, खासदार रक्षा खडसे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, संघटनमंत्री प्रा.सुनील नेवे यांनी मार्गदर्शन केले.
यांची बैठकीस उपस्थिती
जिल्हा परिषद सदस्य कैलास सरोदे, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, तालुका सरचिटणीस महेश चौधरी, वासुदेव नरवाडे, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, मुक्ताईनगर नगराध्यक्षा नजमा तडवी, सावदा नगराध्यक्षा अनिता येवले, पी.के.महाजन, शिवाजी पाटील, पराग पाटील, नेहा गाजरे, रंजना पाटील, नंदा पाटील, नितीन कोळी, अनिता चौधरी, कविता कोळी, योगिता वानखेडे, विकास पाटील, श्रीकांत महाजन, गोपाळ नेमाडे, प्रल्हाद पाटील उपस्थित होते.
मुक्ताईनगरात तालुक्यातही बैठक
मुक्ताईनगर- तालुक्यातील चांगदेव-रुईखेडा, अंतुर्ली-उचंदा जिल्हा परीषद गटातील बुथ समित्यांची बैठक घेण्यात आली. ‘वन बूथ थर्टी यूथ’ या कार्यक्रमानुसार रावेर लोकसभा क्षेत्रात सुमारे दीड महिना बैठकांचे सत्र सुरू राहील, असे माजी मंत्री खडसे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती घरोघर पोहोचवणे अशा 23 कलमी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. खासदार रक्षा खडसे, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, विधानसभा विस्तारक विलास धायडे, तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर उपस्थित होते.