जळगाव: विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. अनेक नेते पक्ष सोडून गेले तरीही पक्षाने यश मिळविले आहे. पदाधिकारी काम करत नसतील तर पदावरून काढून टाका, प्रत्येक बैठकीत तेच तेच चेहरे पाहायला मिळतात, अनेक वर्षांपासून पदावर राहून महिला पदाधिकारी काम करत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. जळगावात आयोजित पक्षाच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
ज्यांनी अडचणीच्या काळात पक्षाला साथ दिली नाही, ते जर परत आले तर त्यांच्याआधी पक्षातील कार्यकर्त्याला संधी दिली जाईल, कागदोपत्री जी संघटना आहे ती प्रत्यक्षात दिसत नाही. करणे सांगायची नाहीत, पुढच्या निवडणुकीत दगड दिला तरी निवडून आणा, मनपासाठी आतापासून काम करा, जबाबदारी आपली आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोमवारी सांगितले आहे.