काम न करताही आठ कोटींची बिले मंजूर

0

मुंबई । वरळीतील सार्वजनिक बांधकाम विभागात आपल्या पदाचा गैरवापर करत येथील अधिकार्‍यांनी अधिकची ‘मोहमाया’ गोळा करण्यासाठी जुन्या वर्क ऑर्डरची बिले अदा न करता तब्बल 800 नवीन कांमाना मंजुरी देत आठ कोटी रूपयांचा अपहार केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रकाश बंब यांनी केला आहे. शासकीय कंत्राटदार एन. पी. शेख यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य सचिवाला याबाबत तक्रार केल्यानंतर गंगापूरखुल्दाबादचे भाजपाचे आमदार प्रकाश बंब यांनीही याप्रकरणी लेखी तक्रार केल्यानंतर याप्रकरणाची चौकशी आता सुरू झाली आहे.