कायदा करा आणि राममंदिर उभारा; अनथ्या परिस्थिती चिघळेल – रामदेव बाबा

0

वाराणसी : अयोध्येतील राममंदिराचं प्रश्न सध्या जोरदार चर्चिला जात आहे. सर्व राजकीय पक्षांचे नेते राममंदिराच्या मुद्द्यावरुन एकमेकांवर टीका करीत आहेत. आता योगगुरू रामदेव बाबा यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. राममंदिराप्रकणी तडजोड, समझोता करण्याची वेळ निघून गेली आहे. आता कायदा करा आणि अयोध्येत राममंदिर उभारा’ अशा शब्दांत रामदेव बाबांनी याविषयावरील आपलं मत व्यक्त केलं आहे. तसंच राममंदिर उभारायला उशीर झाला तर भविष्यात देशातील परिस्थीत चिघळेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात रामदेवबाबा माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलत होते. राममंदिराचा विषय ऐरणीवर येण्यामागे राजकारण आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, त्यावर रामदेव बाबांनी ही प्रतिक्रिया दिली. पत्रकारांशी संवाद साधतेवेळी रामदेवबाबा म्हणाले, अशाप्रकारच्या वारंवार चर्चांमुळे देशाची संस्कृती आणि संस्कार लोप पावत आहेत आणि या गोष्टीची मला खंत आहे. राममंदिराचा विषय हा देशातील जनतेच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे या विषयावर बोलताना राजकीय नेत्यांनी जपून बोललं पाहिजे, असंही रामदेव बाबा म्हणाले.