कायदा-सुव्यवस्था राखण्यात होमगार्डचाही सिंहाचा वाटा

0

सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल : भुसावळात सेवानिवृत्त होमगार्डचा सत्कार

भुसावळ- कायदा व सुव्यवस्था राखण्यात होमगार्ड बांधवांचादेखील सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी येथे काढले. त्यांच्या उपस्थिती सेवानिवृत्त होमगार्ड कर्मचार्‍यांना निरोप देण्यात आला. पंचायत समितीच्या सभागृहात एका छोटेखानी कार्यक्रमात तालुका होमगार्ड पथकातील प्रभारी समादेशक अधिकारी मधुकर लक्ष्मण गोडबोले, अनिल माधव बोरोले, यु.बी. तडवी यांना निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी होमगार्डचे माजी जिल्हा समादेशक विनोद कोळपकर होते मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी मनोगतात आपल्या कार्याचा आढावा घेवून आठवींना उजाळा दिला. प्रसंगी होमगार्डचे प्रभारी समादेशक विश्‍वनाथ खरे, वरीष्ठ पलटन नायक नरवीरसिंग रावळ, सुरेश इंगळे, विद्या लोखंडे, दारासिंग पाटील, वरणगावचे समादेशक संजय चौधरी, जामनेरचे जयंत पाटील, यावलचे भानुदास कवडीवाले, रमेश चौधरी, भुसावळ पथकातील वसंत जाधव, शांताराम बाविस्कर, शैलजा चतुर, व्ही.आर. भंगाळे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी किशोर चावरिया, मिनाक्षी चौधरी, रेखा सावळे, किरण राजपूत, उमाकांत न्हावी, दिपक सिंग सुरूंग, प्रकाश शिगवण यांनी परीरश्रम घेतले. प्रास्ताविक नरविरसिंग रावळ तर सूत्रसंचालन सुरेश इंगळे यांनी केले.