संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी मागणीला दिला हिरवा कंदील
साक्री । साक्री तालुक्यातील म्हसदी येथील कायनकडा धरणात लाटीपाडा धरणाचे पाणी सोडण्यात यावे असे गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला राज्याचे संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी हिरवा कंदील दिल्यामुळे आहे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. धुळे येथे भाजपाचे प्रांतीक सदस्य सुरेश रामराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली २०० पेक्षा अधिक शेतकरी, संघर्ष समितीचे कायकर्ते, धनदाई मंडळाचे अध्यक्ष व संचालक मंडळाच्या पदाधिकारींनी राज्यमंत्री डॉ.भामरे यांची भेट घेतली. यावेळी पांझरा मध्यम प्रकल्प, उजवा कालवा, कायनकडा धरणापर्यत वाढवण्यात यावा व लाटीपाडयाचे पाणी या धरणात सोडण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.
अनेक दिवसापासून होती मागणी
वीस वर्षापासून सातत्याने ही मागणी होत आहे. म्हसदी परिसर अवर्षण ग्रस्त प्रवर्गात आहे. त्यामुळे दरवर्षी दुष्काळाशी सामना करावा लागतो. पिण्याचे पाणी दहा-पंधरा दिवसातुन एकदा मिळते म्हणून हा प्रश्न सुटावा यासाठी पाठपुरावा करण्यात येत होते पण उपयोग होत नव्हते असे सुरेश पाटील यांनी सांगितले. याबाबत तातडीने मुख्य कार्यकारी अभियंता आमले, कार्यकारी अभियंता बडगुजर, साक्री विभागाचे अभियंता पी.जी.पाटील यांच्याशी राज्यमंत्री डॉ.भामरे यांनी चर्चा करून येत्या महीन्यात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. कायनकडा धरणात पाणी सोडण्याचे आश्वासन शेतकर्यांसह संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना डॉ भामरेंनी दिले. त्यामुळे कायनकडा धरणात लाटीपाडयाचे पाणी येईल अशी आशा पल्लवीत झाल्या आहेत. याप्रसंगी काटवान नवसंजीवनी पाट संघर्ष समितीचे पदाधिकारी, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष व संचालक मंडळ, शेतकरी , शेतमजुर, ग्रामस्थ उपस्थित होते.