कायनकडा धरणात लाटीपाडाचे पाणी येणार

0

साक्री । तालुक्यातील म्हसदी येथील कायनकडा धरणात लाटीपाडा धरणाचे पाणी टाकण्याच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला राज्याचे संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी हिरवा कंदील दिल्यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. धुळे येथे भाजपाचे प्रांतीक सदस्य सुरेश रामराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली 200हून अधिक म्हसदी येथील शेतकरी, संघर्ष समितीचे कायकरते व धनदाई मंडळाचे अध्यक्ष व संचालक मंडळाच्या पदाधिकारींनी राज्यमंत्री डॉ.भामरे यांची भेट घेतली. यावेळी पांझरा मध्यम प्रकल्प, उजवा कालवा कायनकडा धरणापर्यंत वाढवण्यात यावा व लाटीपाडयाचे पाणी या धरणात टाकण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले.

ग्रामस्थांमध्ये समाधान
गेल्या 20 वर्षापासून सातत्याने ही मागणी आहे. म्हसदी परिसर अवर्षणग्रस्त प्रवर्गात आहे. त्यामुळे दरवर्षी दुष्काळाशी सामना करावा लागतो.पिण्याचे पाणी दहा-दहा दिवसातुन एकदा मिळते, म्हणून हा प्रश्न सुटावा यासाठी पाठपुरावा करत आहे पण उपयोग होत नाही, असे मत प्रांतिक सदस्य सुरेश पाटील यांनी मांडले. याबाबत तातडीने मुख्य कार्यकारी अभियंता आमले, कार्यकारी अभियंता बडगुजर व साक्री विभागाचे अभियंता पी.जी.पाटील यांच्याशी राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी चर्चा करून येत्या महीन्यात कायनकडा धरणात पाणी टाकण्याचे आश्वासन दिले.