कायली जेन्नरवर चोरीचा आरोप

0

लॉस एंजेलिस : कायली जेन्नर हिच्यावर एका कंपनीने चोरी केल्याचा आरोप केला आहे. या कंपनीच्या बॉर्न टू स्पार्कल मेकअप-लाइनची चोरी केल्याचे या कॉस्मेटीक कंपनीचे म्हणणे आहे. शिरी कॉस्मेटिक्स नामक कंपनीने कायली आणि तिची कंपनी काइली कॉस्मेटिक्सवर चोरीचा आरोप केलाय.

कंपनीने केलेल्या दाव्यानुसार त्यांचे बॉर्न टू स्पार्कल मेकअप-लाइनचे स्वतःचे संकलन आहे. परंतु कायलीने त्यांच्या संकलनाच्या समान रंगांचे पॅकेजिंगसह बॉर्न टू स्पार्कल आयशॅडो ची रेंज सुरू केली आहे. कायलीवर झालेल्या या आरोपावर ती कोणती भूमिका घेतेय हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.