जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांची माहिती ; एक लाखांचा मिळणार रोख स्वरूपात पुरस्कार
वरणगाव- देशभरामध्ये ग्रामीण रुग्णालयांमधील रुग्णसेवा व स्वच्छता यावर अवलंबून असलेली कायाकल्प योजना राबविण्यात आली. या योजनेत वरणगाव ग्रामीण रुग्णालय जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर राज्यात उत्तेजनार्थ पुरस्काराचे मानकरी ठरला. या रुग्णालयाला रोख एक लाख रुपयांची रक्कम मिळणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी वरणगाव ग्रामीण वरणगाव रुग्णालयाच्या भेटीप्रसंगी दिली.
वरणगाव रुग्णालयाने मिळवले 95 टक्के गुण
शहरांमध्ये ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती झाली परंतु वैद्यकीय अधिकार्यामुळे नेहमीच चर्चेत असलेल वरणगाव शहरावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी वैयक्तिक लक्ष घातले. येथील वैद्यकीय सेवा सुरळीत करून रुग्णालयाला कायाकल्प योजनेमध्ये सहभागी करून घेण्यात आले. या योजनेंतर्गत रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णालयाची गुणवत्ता, वैद्यकीय कचर्याची विल्हेवाट, रुग्णालयाचा परीसर, रुग्णांची सेवा, औषधी वाटप यासह विविध मुद्द्यांवर जास्तीत-जास्त गुण मिळवण्यासाठी व सेवा देण्यासाठी कर्मचार्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या मुद्यांतर्गत रुग्णालयाची तपासणी झाल्यानंतर वरणगाव ग्रामीण रुग्णालयाने 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवल्याने रुग्णालयाची कायाकल्प योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रथम तर राज्यात उत्तेजनार्थ पुरस्काराचे मानकरी म्हणून निवड करण्यात आली. पुरस्काराच्या एक लाखांच्या रुकमेतून वैद्यकीय सेवेसाठी आवश्यक असलेले साहित्य अथवा रुग्णालयासाठी गरजेचे बांधकाम करता येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष सुनील काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.क्षितीजा हेंडवे, कार्यालय अधीक्षक जयंत मेढे, प्रयोगशाळा टेक्निशियन बी.पी.लोखंडे, कामगार नेते मिलिंद मेढे आदी उपस्थित होते.
चार वेळेस झाली तपासणी
रुग्णालयाचे कायाकल्प योजनेत नाव आल्यानंतर चार वेळेस तपासणी झाली यामध्ये स्थानिक वैयक्तिक तपासणी पथक जिल्ह्याचे व विभागाचे तपासणी पथक राज्याची तपासणी पथक व देशपातळीवरील तपासणी पथकांनी पडताळणी केल्यानंतरच रुग्णालय पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. यामध्ये येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले
जिल्ह्याला प्रथमच पुरस्कार
गेल्या अनेक वर्षांमध्ये जळगाव जिल्ह्याला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. या योजनेतील प्रथम पुरस्कार हा पंढरपूरला 15 लाखांचा तर द्वितीय पुरस्कार बीड जिल्ह्यात दहा लाांच्या बक्षीस स्वरूपात तर महाराष्ट्रात उत्तेजनार्थ एक लाख रुपये रोख बक्षिसांचे 15 पुरस्कार जाहीर झाले असून त्यात वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचा समावेश आहे.
एचएमआयएस रीपोर्टमध्ये जिल्हा दुसर्या स्थानावर
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जिल्हाभरात दिल्या जाणार्या आरोग्य सेवा व विविध प्रकारच्या अॅक्टिव्हिटीमध्ये जिल्हा 25 व्या क्रमांकावर होता परंतु दोन वर्षांमध्ये जळगाव जिल्हा एचएमआयएस रीपोर्टमध्ये दुसर्या स्थानावर आहे.
रुग्णालयाच्या तिसर्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार
वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दोन टप्प्याचे काम पूर्ण झालेले आहे परंतु तिसर्या टप्प्यातील महिला व पुरुष वार्ड शस्त्रक्रिया विभाग अपूर्ण असल्याने वैद्यकीय अधिकार्यांसह रुग्णांना अडचणी निर्माण होतात यामुळे तिसर्या टप्प्यासाठी 70 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होऊन शहरातील रुग्णांना सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.