मुंबई: प्रियांका चोपडा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांनी नुकताच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये साखरपुडा केला. निक-प्रियांकाने साखरपुडा केल्यानंतर बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्ही कलाविश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामध्येच आता निकच्या एक्स गर्लफ्रेंडने तिची प्रतिक्रिया दिली आहे.
ओलिव्हियोने २०१२ सालचा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला आहे. निक-प्रियांकाने साखरपुडा केल्यानंतर ऑलिव्हिया या दोघांसाठी खुश असल्याचं तिने म्हटलं आहे. ‘आपलं खरं प्रेम हे कधीही आपल्याला मिळू शकतं आणि हे तर कलाविश्व आहे येथे कधी काय होईल सांगता येत नाही. पण मी या दोघांच्या निर्णयामुळे खुश आहे. त्यांना सगळी सुख मिळू देत हीच माझी इच्छा आहे’, असं ऑलिव्हिया म्हणाली.