नवी मुंबई : आजच्या परीस्थितीत सिमेवर दररोज आमचे दोन जवान शहीद होत आहेत. जे देशासाठी प्राण देतात ते खरोखर आमचे भगवान आहे. त्या करीता प्रत्येकांनी सिमाभागात जाऊन यात्रा करून आल्यास भारतमाता विषयी प्रेम जागृत होऊ शकते. दिवसरात्र सैनिक तैनात असताना सरकारला लक्ष देण्यास वेळ नसल्याची खंत विश्व हिंदू परिषदचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी व्यक्त केली. वाशी येथील मराठी साहित्य मंदिर सभागृहात कारगिल विजय दिवस हा जम्मु काश्मीर डोगरा समाज ट्रस्ट व अंत्योदय प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणुन बोलत होते.
सात रत्नांचा करण्यात आला सत्कार
कारगिल युध्दातील साक्षीदार जवान महेंद्रसिंग यादव, हरपालसिंग बिष्ट, समशेरसिंग मेहरा, गोपालदत्त जोशी, गोपालसिंह रवतारा, सुरेशचंद्र, उमेश डिगरा यां सात रत्नाचा सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपिठावर काश्मीरी पंडीत फ्रंटच्या अध्ययक्षा श्रीमती शक्ती मुन्शी, जम्मु काश्मीर डोगरा समाज ट्रस्टचे कृष्णा पंडीत, अंत्योदय प्रतिष्ठानचे सतिश निकम, नवी मुंबई मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे सुभाष कुळकर्णी, अमृत प्रेरणा, महाविर इंटरनँशनलचे टी.सी.बाफणा, कच्छ युवक संघाचे राहुल देडीया, राजस्थान राजपूत परिषदचे उदयविर सिंह, बु-हान्स युथ युनायटेड ( उत्तराखंड ) चे आदिमान्यवर उपस्थित होते.