रत्नागिरी । भरधाव वेगात असनार्या वॅगनकार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याने पाच गाड्यांना धडक देत त्या वाहनांचेही मोठे नुकसान केले त्याचबरोबर पाच जण जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. कारचालकाने दिलेल्या धडकेत दोघे जण गंभीर जखमी अतिवेग ठरला कारणीभूत कुवारबावहून रत्नागिरीच्या दिशेने येणार्या व अपघातांना कारणीभूत असलेल्या या वाहनचालकाचे नाव ऋषिकेश विलास पाटणे असे वॅगनार चालकाचे नाव आहे. ऋषिकेश हा शहरातील प्रतिष्ठित वकिलांचा मुलगा आहे. ऋषिकेशने सर्वप्रथम जयस्तंभ परिसरातील एका दुचाकीला त्याने उडवले. यानंतर कुवारबावपासून त्याची कार सुसाट रत्नागिरीच्या दिशेने जायला लागली.
एसटी स्टँडजवळ घडली घटना
एसटी स्टँड समोर आल्यानंतर ऋषिकेशने गाडी रस्त्याच्या मध्यभागी असणार्या रेलिंगवर घातली. या ठिकाणाहून दाक्षिणात्य सिनेमात जशी गाडी उडते तशीच ऋषिकेशचीही गाडी उडाली. त्यानंतर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. गाडीने समोर येईल त्या वाहनाला त्याने उडवत नेले. तीन दुचाकी आणि एका सुमो गाडीला धडक देवून ती वॅगनार थांबली. शहर पोलिसांनी ऋषिकेश पाटणे याला ताब्यात घेतले आहे.